Sunday, October 06, 2024 03:02:43 AM

'उड्डाणपूलप्रकरणाची ३ सदस्यीय समिती चौकशी करणार'

उड्डाणपूलप्रकरणाची ३ सदस्यीय समिती चौकशी करणार

चिपळूण नजीकच्या बहादुर शेख नाक्याजवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणीच गर्डर कोसळला त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गर्डर कोसळल्यानंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घटनस्थळाचा आढावा घेतला.

बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पडलेल्या उड्डाण पुलाची गांभीर्याने दखल घेतली. गर्डर कोसळल्याती माहिती मिळता मुंबईवरून येताच रवींद्र चव्हाण यांनी बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाची पाहणी केली. तसेच बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पडलेल्या उड्डाण पुलाची गांभीर्याने दखल घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारीही बांधकाम मंत्र्यांसोबत उपस्थित होते.

बहादुर शेख नाक्याजवळ मुंबई- गोवा महामार्ग आणि चिपळूण कराड मार्ग असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी चौपदरीकरणात एकूण ४५ पिलर चा मोठा ब्रिज आहे. सध्या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या पीलरवर बसवलेल्या गर्डरला मध्येच तडे गेल्याने कामाचा दर्जा पुन्हा एकदा पुढे आला आहे. गणपती नंतर येथे या पीलरवर गर्डर उभारला गेला होता. अवघ्या दोन आठवड्यातच त्याला तडे गेले आणि तो कोसळला.


सम्बन्धित सामग्री