Sunday, July 07, 2024 12:51:42 AM

मुंबई-पुणे महामार्गावर ब्लॉक

मुंबई-पुणे महामार्गावर ब्लॉक

पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुन्हा एक तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी बारा ते एक च्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे. या काळात संपूर्ण महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

गेल्या आठवडण्यात या मार्गावर दोन वेळा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मुंबईच्या लेनवर बोरघाटात किलोमीटर ४५/६०० आणि किलोमीटर ४१/५०० या ठिकाणी ओव्हर ग्रॅंटी उभारण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा आज एका तासाचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर आयटीएमसी प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत आडोशी बोगदाजवळ आता ४० किमी/१०० आणि ४० किमी/९०० या ठिकाणी ओव्हर ग्रॅंटी बसविण्यात येणार आहे.

त्यामुळे दुपारी तासभर पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक आज खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून द्रुतगती महामार्गावर वळवली जाणार आहे. दरम्यान, या वेळेत पर्यायी मार्गाचा वापर कराव असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री