Friday, July 12, 2024 05:39:56 PM

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

अकोला, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. १४ ऑक्टोबर २०२३) निळवंडे उर्ध्व प्रवरा प्रकल्पात पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. मात्र निळवंडे धरणाच्या पाण्यावर सर्वप्रथम अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे. उजवा कालवा व उच्चस्तरीय कालव्याचे काम अर्धवट स्थितीत असताना महसूल मंत्र्यांच्या हस्ते डाव्या कालव्यातील पाणी सोडणार असल्यामुळे अकोल्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या संदर्भात डॉ. अजित नवले यांच्यासोबत आलेले आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

महत्वाचे मुद्दे -

महसूल मंत्री विखे पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल
महसूल मंत्री विखे पाटलांची आंदोलकांशी चर्चा सुरू

महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट
महसूल मंत्र्यांच्या कार्यक्रमाअगोदर आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट


सम्बन्धित सामग्री