Monday, July 08, 2024 10:53:56 PM

जळगाव मध्ये टोल वसुलीच्या विरोधात मनसे आक्रमक

जळगाव मध्ये टोल वसुलीच्या विरोधात मनसे आक्रमक

जळगाव, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: तीनचाकी आणि चार चाकी वाहने यांचा टोल महाराष्ट्र शासन भरत असतानाही वाहन धारकाकडून टोल नाक्यावर टोल वसुली केली जात असल्याने, यांच्या विरोधात आज जळगाव मध्ये मनसे कडून नशिराबाद गाव येथील टोल नाक्यावर आंदोलन करत तीन चाकी आणि चार चाकी वाहने सोडून देत आंदोलन करण्यात आले आहे.

'तीन चाकी आणि चार चाकी वाहनाचा टोल महाराष्ट्र शासन भरत आहे' असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते. यावर बोलताना मनसे पदाधिकारी यांनी यांनी म्हटले की, जर महाराष्ट्र शासन यांचा टोल भरत असेल तर मग तो जनतेकडून वसूल का केला जात आहे ? हा वसूल करण्यात येत असलेला टोल या पुढे जनतेने भरू नये. यासाठी जन जागृती व्हावी म्हणून आज मनसे तर्फे टोल नाक्यावर गाड्या सोडण्याचे आंदोलन करण्यात आले. यापुढे जर टोल वसुली केली तर तीव्र स्वरूपात मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

           

सम्बन्धित सामग्री