Sunday, June 30, 2024 09:53:51 AM

ससूनमधील पाच कैद्यांची येरवड्यात रवानगी

ससूनमधील पाच कैद्यांची येरवड्यात रवानगी

उपचाराचे निमित्त देत पुण्यातील ससून रुग्णालयात मुक्काम ठोकलेल्या कैदयांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आले आहे. यात माजी आमदार अनिल भोसले, मटका किंग वीरल सावला, मारणे टोळीचा रुपेश मारणे, प्रवीण राऊत आणि हेमंत पाटील या कैदयांचा सामवेश आहे. हे कैदी गेल्या ४ महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होते.

ससून रुग्णालय प्रशासनाने शनिवारी (ता. ७ऑक्टोबर) आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधे पुरवठा याबाबत सादर केलेल्या अहवालानुसार ससूनमध्ये शुक्रवारपर्यंत १६ कैद्यांवर उपचार सुरू होते.त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात केवळ चार कैद्यांनाच वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या चार कैद्यांना वगळून उर्वरित १२ कैद्यांची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री