Tuesday, July 02, 2024 09:06:45 AM

तपासणी होताच रुग्णालयातील बेडशीट गायब…

तपासणी होताच रुग्णालयातील बेडशीट गायब…

वसमत, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी केवळ फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

हिंगोलीतील वसमत उपजिल्हा रुग्णालयाची दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली. तपासणी पथक येण्यापूर्वी प्रत्येक बेडवर स्वच्छता करून बेडशीट अंथरण्यात आले. अगदी एखाद्या खासगी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली, मात्र तपासणी पथक निघून जाताच रुग्णालय प्रशासनाने सर्व बेडशीट काढून घेऊन रुग्णांना थेट गादीवर ठेवले. तपासणीला आलेल्या पथकासमोर केवळ नाटकबाजी करून सोपस्कार पार पाडणाऱ्या वसमत उपजिल्हा रुग्णालयाचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे.


सम्बन्धित सामग्री