Monday, July 08, 2024 11:43:10 PM

राजपूत समाजाचे जळगावमधील आंदोलन मागे

राजपूत समाजाचे जळगावमधील आंदोलन मागे

जळगाव, ०८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राजपूत समाज्याच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसापासून गिरीश परदेशी आणि रोशन राजपूत या दोन तरुणांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संवाद साधत येत्या पंधरा दिवसात आपल्या मागण्या मान्य करण्याबाबत चा निर्णय घेतला जाईल अशा प्रकारच आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर उपोषणकर्त्यांनी पंधरा दिवस सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिले असून, तो पर्यंत आजचे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र येत्या पंधरा दिवसात जर मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर मात्र पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्ते गिरीश परदेशी आणि रोशन राजपुत यांनी सरकारला दिला आहे.


सम्बन्धित सामग्री