Monday, July 08, 2024 01:28:48 AM

छत्रपती संभाजीनगरमधील ५ तालुक्यात पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगरमधील ५ तालुक्यात पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे संपूर्ण नदी, नाले, पाझर तलाव अद्यापही कोरडे ठाक पडले आहे. पावसाळा संपण्या अगोदरच यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तहानलेली गावे आणि वाड्यांना ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहेत. एवढेच नव्हे, तर ८८ विहिरीदेखील अधिग्रहित करण्यात आल्या आल्या असून आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३१ गावे, फुलंब्री तालुक्यात १ गाव पैठण तालुक्यातील २६ गावे आणि २ वाड्या गंगापूर तालुक्यातील १ आणि सिल्लोड तालुक्यात ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री