Sunday, June 30, 2024 09:59:47 AM

खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा

खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा

नांदेड, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या घटनेवरून राजकारण पेटलं असून विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यादरम्यान शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांना रुग्णालयाचे शौचालय करायला लावले. यानंतर आता खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री