Saturday, July 06, 2024 11:15:19 PM

साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी.?

साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

नाशिक, १ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: शिर्डी साईबाबा संस्थांनच्या बैठकीत,देशभर साईमंदिर उभारण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी संस्थांनच्या या निर्णयास विरोध दर्शविल्याने, संस्थान व शिर्डी ग्रामस्थांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

देशभरातील साई भक्तांकरिता, इतर राज्यात संस्थानाला ५ एकर जमीन दिल्यास त्याठिकाणी संस्थान शिर्डीच्या साईमंदिराच्या धर्तीवर, प्रति साई मंदिर उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. अगोदरच शिर्डीत अनेक समस्या उभ्या असताना, संस्थानाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संस्थानने घेतलेला हा निर्णय ताबडतोप मागे घेतला नाही तर संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री