Thursday, September 19, 2024 09:27:43 PM

आदित्यंकडून रोखठोक उत्तर

आदित्यंकडून रोखठोक उत्तर

लंडनच्या संग्रहालयातील छत्रपती शिवरायांची वाघनखं पुढच्या तीन वर्षांसाठी राज्य शासन भारतात आणत आहेत. परंतु या वाघनखांवरून सध्या जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. ती शिवरायांची वाघ नसल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे. तर त्यांचीच री ओढत विरोधकांनी देखील सरकारला यावरून धारेवर धरलं आहे. वाघनखं खरी असतील तर पुरावे द्या नाहीतर शिवभक्तांच्या भावनांशी खेळू नका, असं आव्हानच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे. यावरून भाजपा नेत्यांनी शनिवारी आदित्य ठाकरे यांना जोरदार समाचार घेतला. त्यांना आदू बाळ म्हणून हिणवलं. आता भाजपा नेत्यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

एका आदू बाळाने केवढं यांना सळो की पळो केलं, हे दिसत आहे. देशातल्या एका नेत्यांचं यांनी पप्पू नाव ठेवलं. त्यांनी यांना हलवून ठेवलं आहे आणि इकडे बाळ म्हणून मला हिणवलं. माझं नाव बाळ ठेवलं याचा मला अभिमान आहे. कारण माझ्या आजोबांचं नाव देखील बाळा होतं. तर ते रक्तात आहे. या बाळने त्यांना किती हलवून ठेवलंय हे दिसतं आहे, असं प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्या टीकेला दिलं.


सम्बन्धित सामग्री