Wednesday, October 02, 2024 11:09:02 AM

कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ

कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ

सिंधुदुर्ग, १ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत असून त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे ११० किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून पश्चिम- पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. गोवापासून कोकण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. त्यामुळे कोकणात मासेमारी आणि पर्यटन ठप्प झालं आहे.

दुसऱ्या दिवशी ही समुद्र खवलेल्या स्थितीत आहे. तर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सिंधुदुर्ग सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे.


सम्बन्धित सामग्री