Wednesday, July 03, 2024 01:38:40 PM

एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २०४ रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता १६८४, रुपयांना विकला जाणार आहे.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या?
कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत २०३.५० रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १,६३६.०० रुपयांऐवजी १,८३९.५० रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०४ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत १,४८२ रुपयांवरून १,६८४ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २०३ रुपयांनी वाढली असून येथे १,६९५ रुपयांवरून १८९८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत १९किलोचा एलपीजी सिलिंडर १७३१.५० रुपयांना विकला जाणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत?
महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर १ ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट
सप्टेंबर २०२३ मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १५८ रुपये झाली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महाग होऊ शकते.


सम्बन्धित सामग्री