Wednesday, July 03, 2024 12:43:53 PM

मुंबईचा प्रवेश महागला!

मुंबईचा प्रवेश महागला

मुंबईत प्रवेश करणाऱ्या एन्ट्री पॉईंटवरील टोल दरात आजपासून वाढ झाली आहे. मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल महाग झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रवेश करणे आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांना खिसा थोडा रिकामा करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २७ सप्टेंबर २००२ च्या अधिसूचनेत दर तीन वर्षांनी टोल दरवाढीसंदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यानुसार ही टोल दरवाढ केली जाणार आहे. या टोल दरवाढीवर याआधीच टीका झाली आहे. टोल दरवाढीचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयावर टीका केली होती.

टोलचा नवा दर काय ?

पूर्वी चार चाकी वाहनांसाठी ४० रुपये टोल होता. आता त्यात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या पूर्वी मिनी बससाठी ६५ रुपये, ट्रकसाठी १३० रुपये आणि अवजड वाहनासाठी १६० रुपये टोल द्यावा लागत होता.

  • छोटी वाहने – ४५ रुपये
  • मध्यम अवजड वाहने – ७५ रुपये
  • ट्रक आणि बसेस – १५० रुपये
  • अवजड वाहने – १९० रुपये

सम्बन्धित सामग्री