Saturday, July 06, 2024 11:29:10 PM

पितृपक्षातही सोने खरेदीसाठी गर्दी

पितृपक्षातही सोने खरेदीसाठी गर्दी

जळगाव, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पितृपक्षातही सोने खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाराशे रुपयांची घसरण आणि जोडून आलेल्या चार दिवस सुट्या असा योग जुळून आल्याने जळगावच्या सुवर्ण नगरीत कधी नव्हे ते पितृपक्षातही सोने खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पितृपक्ष सुरू झाला की जळगावच्या सुवर्ण नगरीत नेहमीच साम सुम पाहायला मिळत असते. यंदा मात्र यांच्या अगदी विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. पितृपक्षात ही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. ही गर्दी होण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे सांगितली जात आहेत.

यामध्ये गेल्या महिनाभरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात संपूर्ण जिल्हाभरात समाधान कारक पाऊस झाल्याने खरीपसह रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातात येणार असल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. यासोबतच जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. सलग चार दिवस सुट्या मिळाल्याने अनेक ग्राहकांनी पितृपक्ष असतानाही सोने खरेदीचा अनोखा मुहूर्त शोधला असल्याचं पाहायला मिळत आहे.


सम्बन्धित सामग्री