Saturday, July 06, 2024 10:56:31 PM

साईभक्तांचे रक्त आता गरजूंसाठी मोफत

साईभक्तांचे रक्त आता गरजूंसाठी मोफत

नाशिक, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: साईबाबा संस्थानच्या झालेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यात नवीन दर्शनपासेस पॉलिसी, डोनेशन पॉलिसी, रक्तदान पॉलिसी, साईमंदिर निर्माण पॉलिसी, देशव्यापी मंदिर असोसिएशनची स्थापना आदीं घोषणा केल्या आहेत. या सर्व योजनांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भाविक आणि ग्रामस्थांकडून सूचना मागवण्यात येणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे सीईओ पी. शिवा शंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रुग्णांना मोफत रक्त

साईबाबा संस्थानमार्फत मंदिर परिसरात रक्तदान वाढीसाठी भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे दानात मिळालेले रक्त रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. इथे काही बाहेरील रक्तपेढ्याही रक्तसंकलन करतात. त्यांनाही हे रक्त मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रुग्णांशी संपर्क करुन खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल आणि नॉट फॉर सेल लिहिलेले असेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री