Tuesday, July 02, 2024 09:32:40 AM

बुलढाण्याच्या चिखलीतील विषबाधा प्रकरण

बुलढाण्याच्या चिखलीतील विषबाधा प्रकरण

बुलढाणा, २६ सप्टेंबर २००२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचे अन्न दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.मुलींच्या वसतीगृहातील मुलींना अळ्या असलेले अन्न, सडलेला भाजीपाला खायला घालणाऱ्या वॉर्डन स्मिता जोशी विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात विविध कलमांसह एट्रासिटी गुन्हा ॲक्ट नुसार दाखल करण्यात आला आहे. चिखली शहरातील मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना अळ्या असलेले निकृष्ट दर्जाचे अन्न खायला दिल्याने ६ मुलींना विषबाधा झाली होती. प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याएवजी वस्तीगृह प्रशासनाने खाजगी रुग्णालयात दाखल करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा विषबाधा झालेल्या ६ मुलींपैकी एका मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वस्तीगृहाची वॉर्डन स्मिता जोशी हिनेच मुलींना अळ्या तसेच उंदराच्या लेंड्या असलेले अन्न खायला दिले. मुलींनी जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा जातीवाचक शिवीगाळ करून "तुझा वस्तीगृहातील प्रवेश रद्द करीन" अशी धमकी देखील वॉर्डन स्मिता जोशी मुलींना देत होती. यावरून पोलिसांनी स्मिता जोशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


सम्बन्धित सामग्री