Wednesday, July 03, 2024 04:13:00 AM

बुलढाण्यात ढगफुटी

बुलढाण्यात ढगफुटी

बुलढाणा, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नागपूरमध्ये झालेल्या ढगफुटीच्या पावसाची घटना ताजी असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातही अतिवृष्टीने हाहा:कार उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदुरा तालुक्यातील लोणवडी, खडदगाव पिंपळखुटा धांडे आणि माळेगाव गोंड या गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोणवडी गावात शेती सोबतच शेतकऱ्यांवर पशुधन गमवावे लागले. तब्बल ३० ते ३५ जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, नांदुरा मोताळा या तालुक्यात तुफान पाऊस कोसळत आहे. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, हा पाऊस शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास देखील हिरावून घेत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाले आहे.


सम्बन्धित सामग्री