Sunday, October 06, 2024 09:05:07 PM

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

नाशिक, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: नाशिक शहरात विविध गणेश मंडळाकडून परंपरेनुसार लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक मंडळाकडून आकर्षक देखावे देखील साकारण्यात आले आहेत. या मधीलच एक सुंदर असा देखावा नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिक शहरातील रविवार कारंजा येथील रविवार कारंजा गणेशोत्सव मित्र मंडळाकडून हुबेहूब केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ज्या भाविकांना केदारनाथ येथे जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, त्यांना केदारनाथाचे दर्शन घेणे सुलभ व्हावे, या हेतूने मंडळाकडून हा देखावा तयार करण्यात आला आहे. तब्बल ३० फूट रुंद, ५० फूट लांब आणि ५० फूट उंच असा हा आकर्षक देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मंदिराच्या प्रतिकृतीवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. हा देखावा बघण्यासाठी नाशिकमधल्या भाविकांनी गर्दी केली आहे.


सम्बन्धित सामग्री