Wednesday, October 02, 2024 11:12:48 AM

कांदा लिलाव तिसऱ्या दिवशी देखील राहणार बंदच

कांदा लिलाव तिसऱ्या दिवशी देखील राहणार बंदच

नाशिक, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीनंतर देखील व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कांदा लिलाव तिसऱ्या दिवशी देखील बंदच राहणार आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कांदा लिलाव बंद आहेत. जिल्ह्यात रोज सुमारे दीड लाख क्विंटल कांद्याचे लिलाव पडत पार असतात. व्यापाऱ्यांच्या असलेल्या काही मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे आरोप करत लिलावात सहभागी न होण्याचे निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने लिलाव बंद आहेत. नाफेड कडून देशातील बाजार समिती मध्ये होणाऱ्या कांदा विक्री बंद करावे,तसेच कांद्यावरील निर्यात रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे.

२२ सप्टेंबर रोजी येवला मध्ये दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे आजपासून व्यापाऱ्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे.

     

सम्बन्धित सामग्री