Sunday, October 06, 2024 09:20:13 PM

आली गवर आली..!

आली गवर आली

गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे गौरी. गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते. गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान आहे. वाजत-गाजत गौराईला घरी आणले जाते. गौरीला साडी नेसवून तिला नटवले जाते. गौरीची स्थापना व इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये गौरी महालक्ष्मी हा सण साजरा करायची वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत.

मराठवाड्यामध्ये गौरीलाच महालक्ष्मी म्हटलं जातं. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या असं म्हणत महालक्ष्मीची स्थापना केली जाते. तर कोकणातला गौरी गणपतीचा उत्सव हा वेगळा असतो. गणपती बाप्पा सोबत येणाऱ्या या गौरीची स्वागताची परंपरा ही वेगळी आहे. घरोघरी या माहेरवाशिणीचे वेगवेगळ्या रुपात स्वागत करत पाहुणचार केला जातो. यामुळे या सणाला गौरी गणपतीचा सण असेही म्हटले जाते आणि महाराष्ट्रात तो भक्तीभावाने, उत्साहात साजरा केला जातो. या गौराईच्या स्वागतावेळी कोकणात नववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते.

गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते. गौराईच्या सणाचे विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वेशीवेशीवर या माहेरवाशिणीच्या पूजेची पद्धत, नैवेद्याची पद्धत बदलते. वाजत, गाजत, नवी साडी- चोळी आणि दागिन्यांनी मढवून गौराईला घरी आणले जाते. या गौराईची स्थापना, तयारी माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओवसा भरण्याची पद्धत साजरी केली जाते.

गौरीच्या आगमनानंतर अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही.


सम्बन्धित सामग्री