Saturday, July 06, 2024 11:35:53 PM

गणपती मंडळापुढे चक्क भीकपेटी

गणपती मंडळापुढे चक्क भीकपेटी

सोलापूर, २१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: सचिन तेंडुलकर याने जंगली रमीची जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील अकोलेकाटी गावातील गणपती मंडळपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी या मंडळाला भेट देत गणरायाची पूजा केली. त्यानंतर या पेटीत स्वतः १०० रुपये टाकत सचिन तेंडुलकरवर टीका केली. महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितके गणेश मंडळ आहेत तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे विसर्जन झाल्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या घरी पोहचवू अशा इशारा देखील आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.


सम्बन्धित सामग्री