Sunday, July 07, 2024 05:07:12 PM

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

नाशिक, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, सेप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच डेंग्यूचे ४२९ नवे संशयित रुग्ण आढळल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. संशयित रुग्णांपैकी ७० जणांचे अहवाल डेंग्यू पॉसिटीव्ह आले असल्याने, डेंग्युबाधितांचा एकूण आकडा ३३१ वर पोहोचला आहे.

यंदा पाऊस कमी असूनही डेंगूलचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार सलामी दिली. मात्र यामुळे घरपरिसरातील ठिकठिकाणी साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडीस ईजिप्ती या प्रजातीच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे डेंग्यू बाधितांचा आकडा ही वाढत गेला. सेप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच डेंग्यूचे ४२९ नवे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० जणांचे अहवाल डेंग्यू पॉसिटीव्ह आले आहेत. हा जरी सरकारी आकडा असला तरी खासगी रुग्णालयांमध्येही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.

शहरात फवारणी करण्याची मागणी होत असताना देखील आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याचे आरोप स्थानिकांनी केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

     

सम्बन्धित सामग्री