Wednesday, October 02, 2024 10:59:30 AM

शाळा बंद आंदोलन

शाळा बंद आंदोलन

बुलढाणा, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील भादोला गावात गेल्या नऊ महिन्यापासून गणित आणि विज्ञान विषय शिकवायला शिक्षकच नाही. त्यामुळे भादोला येथील जिल्हा परिषदेतील शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेवर कार्यरत असलेले संदीप जठाल नामक शिक्षकाला जिल्हा परिषदेचे काम सोपवण्यात आले आहेत. त्यांचा पगार जिल्हा परिषदेच्या शाळेतून होतो मात्र काम त्यांना जिल्हा परिषदेचे करावे लागते. त्यामुळे संदीप जठाल यांना या शाळेवर पूर्ववत शिकवण्यासाठी पाठवावे या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शाळा बंद आंदोलन करत जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री