Friday, July 05, 2024 02:41:45 AM

नामांतर झाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव

नामांतर झाले औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदललं आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव झालं आहे. राज्य सरकारने १५ सप्टेंबर रोजी राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याची नावं बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असं सांगितलं होतं. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावं कशी बदलली अशी विचारणा उच्च न्यालयाने केली. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असं सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार आता उस्मानाबाद आणि औरंगाबाद या संपूर्ण जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली.

आधी आता
औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग
औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
औरंगाबाद उप-विभाग छत्रपती संभाजीनगर उप-विभाग
औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका
औरंगाबाद गाव छत्रपती संभाजीनगर गाव

आधी आता
उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा
उस्मानाबाद उप-विभाग धाराशिव उप-विभाग
उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका
उस्मानाबाद गाव धाराशिव गाव

https://twitter.com/cbawankule/status/1702928675539505301


सम्बन्धित सामग्री