Sunday, October 06, 2024 03:10:23 AM

शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार

शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार

मुंबई, ८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच मायभूमीत परत येणार आहेत. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार इंग्लंडला जाणार आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यादिवशीच परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदू तिथीनुसार आणण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच इतर तारखांचा देखील विचार केला जात आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार अफजल खानाचा वध केल्याची तारीख १० नोव्हेंबर आहे. हिंदू तिथीनुसार येणाऱ्या तारखांचा देखील विचार करण्यात येत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री