Tuesday, July 02, 2024 09:09:50 AM

गौतमी पाटीलवर कोसळला दु:खाचा डोंगर

गौतमी पाटीलवर कोसळला दुखाचा डोंगर

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : गौतमी पाटीलचे वडील रविंद्र पाटील यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्याच्या धनकवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गौतमीवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गौतमीचे वडील रविंद्र बाबुराव पाटील यांचं पुण्यात निधन झालं आहे. सोमवारी ३ वाजण्याच्या सुमारास गौतमीच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या धनकवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील धुळ्यात रस्त्याकडेला बेवारस व दयनीय अवस्थेत आढळून आले होते. स्वराज्य फौंडेशन या एनजीओचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी रवींद्र पाटील यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्याकडे असलेल्या आधारकार्ड वरून त्यांची ओळख पडली होती. आधारकार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

वडील रुग्णालयात असल्याचे कळाल्यावर गौतमीने त्यांनी पुढील उपचारांसाठी पुण्यात आणलं होतं. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. त्यांच्यावर पुढील उपचार मी पुण्यालाच करणार असल्याचे गौतमीने एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं होते. रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती. गौतमी पुण्यातच लहानाची मोठी झाली.


सम्बन्धित सामग्री