Tuesday, July 02, 2024 08:21:25 AM

पोलीस ठाण्याच्या हद्दीत एअर होस्टेसचा मृतदेह

पोलीस ठाण्याच्या हद्दीत एअर होस्टेसचा मृतदेह

पवई, ०४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: एअर इंडियाची २३ वर्षीय एअर हाेस्‍टेसचा मुंबईतील पवई येथे बंद फ्लॅटमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. पोलिसांना तिचा मृतदेह बाथरुममध्ये आढळला. मुंबईतील पवई परिसरातील एका आलिशान गृहनिर्माण संकुलातील सदनिकेत २३ वर्षीय हवाई सुंदरीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्यानेपरिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एन जी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये एअर होस्टेसचा मृतदेह आढळला. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केलाअसूनया प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. रुपल ओग्रेअसे हत्या झालेल्या हवाई सुंदरीचं नाव असून ती मूळची छत्तीसगडची आहे. रुपल यावर्षी एप्रिलमध्ये एअर इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी एअर होस्टेसमधून रुजू झाली होती. सोमवारी ती राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. धारदार शस्त्रानेगळा चिरुन तिची हत्या करण्यात आली होती. पवई पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आली.

कुटुंबीयांनी तिच्या काही मित्रांना याबाबत माहिती दिली,ते एन.जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील रुपलच्या घरी गेले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. घरातून कोणताच प्रतिसाद देत नव्हता. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता रुपल मृतावस्थेत आढळली.


सम्बन्धित सामग्री