Wednesday, July 03, 2024 01:04:59 AM

nashik-water-scarcity-nashik-water-shortage-shortage-of-water
नाशिककरांना पाण्याची चिंता

नाशिककरांना पाण्याची चिंता

नाशिक, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पावसाळ्यातले तीन महिने उलटले तरी गोदावरी नदीला अद्याप एकही पूर आलेला नाही. नाशिककरांसाठी जेमतेम ७० टक्के पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. यामुळे वर्षभर पाणी कसे पुरवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी पुरेसा पाऊस पडला तर गोदावरीला तीन ते सहा वेळा पूर येतो. पण यंदा नदीला एकही पूर आलेला नाही. याआधी २०१८ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती पुरोहित संघाचे सभासद सुरेश शुक्ल गुरुजी यांनी दिली. पावसाने दडी मारल्याने नदीत असलेले पाणी गढूळ झाले आहे. यामुळे भाविकांमध्येही नाराजी दिसून येत आहे.


सम्बन्धित सामग्री