Thursday, July 04, 2024 08:55:58 AM

malegaon-woman-targeted-by-ats
मालेगावची महिला एटीएसच्या निशाण्यावर

मालेगावची महिला एटीएसच्या निशाण्यावर

मालेगाव, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानी नागरिकासोबत पुनर्विवाह केल्याप्रकरणी मालेगावची एक महिला एटीएसच्या रडारवर आली आहे. एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून तिची कसून चौकशी करण्यात आली आहे. मालेगावची ही महिला पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने महिलेचा जबाब नोंदवला असल्याची माहिती आहे. सीआयएसएफ तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला आलेल्या मेलवरून ही माहिती समोर आली. मालेगाव हे माहेर असलेल्या या महिलेचा मराठवाड्यातील एका व्यापाऱ्याशी विवाह झाला होता. नंतर तिची एका पाकिस्तानी नागरिकाशी जवळीक झाली आणि ती त्याच्या सोबत पळून गेली होती. तिने काही दिवसांनी पाकिस्तानी नागरिकाशी पुनर्विवाह करून परदेशात मुक्काम केला. काही दिवसांपूर्वी ती मालेगावमध्ये माहेरी परतली आहे. आता ही महिला तिच्या पालकांसोबत राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएस कडून तिची कसून चौकशी होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा दहशतवादी कारवायांशी काही संबंध तर नाही ना, याचीही चौकशी केली जात आहे. याबाबत एटीएस कडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री