Monday, July 01, 2024 03:39:28 AM

a-building-collapsed-in-jalgaon
जळगावमध्ये इमारत कोसळली

जळगावमध्ये इमारत कोसळली

जळगाव, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : जळगावमध्ये शिवाजीनगर भागातील अमर चौक येथे ७४ वर्ष जुनी इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात राजश्री सुरेश पाठक नावाची ७० वर्षांची महिला अडकली होती. या महिलेचा मृत्यू झाला. मदतकार्य करत असलेल्या पथकाने राजश्री यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोसळलेली इमारत जीर्ण झाली होती. यामुळेच ही इमारत कोसळली. जळगाव महापालिका प्रशासनाच्या नेतृत्वात मदतकार्य सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री