Tuesday, July 02, 2024 11:28:09 PM

water-supply-stopped-in-pune-on-thursday
पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. या कामामुळे पर्वती जलकेंद्रातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती एमएलआर, पर्वती एचएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी, एसएनडीटी एमएलआर तसेच एचएलआर परिसर, चतु:शृंगी टाकी, कोंढवे-धावडे जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र आणि त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे शुक्रवारी एक सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. येथे पाणीपुरवठा बंद असेल पुणे शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरूण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतापणी नगर भाग एक आणि दोन, लेक टाऊन, शिवतेजनगरग, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोले मळा येथे पाणीपुरवठा बंद असेल.


सम्बन्धित सामग्री