Sunday, July 07, 2024 08:15:57 PM

hsc-exam-will-be-held-on-21-february-2024-and-ssc-exam-will-be-held-from-1-march-2024
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची १ मार्चपासून

यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची १ मार्चपासून

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी - मार्च २०२४ च्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नियोजन करणे सोपे होणार आहे. वेळापत्रक जसे जाहीर झाले आहे तसेच किंवा किरकोळ बदलासह २०२४ मध्ये अंमलात येणार आहे, असे शिक्षण मंडळाने सांगितले. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ रोजी तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ रोजी सुरू होणार आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०२४ या काळात होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमधून बारावीची आणि दहावीची परीक्षा होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थात वेबसाईटवर दहावी आणि बारावीचे फेब्रुवारी - मार्च २०२४ चे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे. हे वेळापत्रक बघणे, डाऊनलोड करणे शक्य आहे. वेळापत्रकाची प्रिंट काढणेही शक्य आहे. अंतिम वेळापत्रक हे परीक्षेच्या काही आठवडे आधी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्या माध्यमातून छापील स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अंतिम आणि अधिकृत वेळापत्रक असेल.

           

सम्बन्धित सामग्री