Sunday, July 07, 2024 01:39:25 AM

palghar-farmers-are-worried
पालघरचे शेतकरी चिंतेत

पालघरचे शेतकरी चिंतेत

पालघर, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भात उत्पादनात नेहमीच आघाडीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पालघर जिल्ह्यात ७९ हजार हेक्टर जमिनीवर भाताची लागवड होते. मात्र, पावसाच्या उघडीपीमुळे उत्पादनाचे गणितच चुकू लागले आहे. काही ठिकाणी या पिकांवर कीटक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. तसेच शेतामधील तण वाढल्याने शेतकऱ्यांसाठी नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.


सम्बन्धित सामग्री