Sunday, June 30, 2024 10:10:52 AM

shravani-somvar-celebrated-with-enthusiasm
श्रावणी सोमवार उत्साहात साजरा

श्रावणी सोमवार उत्साहात साजरा

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशातील विविध भागातून भाविक येत असतात. या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. https://www.youtube.com/watch?v=TAbwQADVbAA औंढा नागनाथ नगरीत परराज्यातील भक्तांची दर्शनासाठी गर्दी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. मंदीरात भाविकांनी रविवारी रात्रीपासूनच गर्दी केली होती. मंदिरात श्रींची महापूजा झाल्यानंतर रात्री २ वाजता मंदिर उघडण्यात आलं. 'बम बम भोले' 'श्री नागनाथ महाराज की जय' या जयघोषाने मंदीर दणाणून गेले. https://www.youtube.com/watch?v=xUbDOc8_k2k चांदवड चंद्रेश्वरी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी चांदवड इथल्या चंद्रेश्वरी महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबई नाशिक महामार्गाजवळील डोंगरावर चंद्रेश्वरी हे अति प्राचीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. https://www.youtube.com/watch?v=SfTWvK1LYe0 महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रोषणाईसह फुलांची सजावट दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येवल्यातील महामृत्युंजय मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी मंदिर परिसरात करण्यात आलेल्या रोषणाईने परिसर झळाळून निघाला आहे. पहाटे पासूनच महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी दिसते आहे.


सम्बन्धित सामग्री