Thursday, July 04, 2024 09:30:51 AM

students-poisoned-in-ashram-school
आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा

आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा

भंडारा, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यात येरली येथील आदिवासी आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तुमसर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ६ मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी रुग्णालयात जावून डॉक्टरांकडून माहिती घेत विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली. या आदिवासी शाळेत ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सर्वांना एकत्र तयार केलेले भोजनच दिले जातात. त्यामुळे कदाचित विषबाधा होणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ही घटना घडली. आश्रमशाळेत दुपारच्या जेवणात आलुची भाजी मिळाली होती. त्यानंतर काही वेळात मुलांना मळमळ, उलट्या व्हायला सुरूवात झाली पण एका मागे एक मुलांना उलट्या होत असल्याने सर्व मुलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली येथील आदिवासी आश्रमशाळा गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येत आहे. या आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण दिले जात आहे. तिथे सुमारे ३२५ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहे. आज नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. बटाटा, वाटाणा, भात, वरण, चपाती याच भोजन केल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला लागले. तर, काहींना चक्कर आली. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांकडे केली. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.


सम्बन्धित सामग्री