Sunday, July 07, 2024 12:36:03 AM

europe-tour-of-22-mlas-of-maharashtra
महाराष्ट्राच्या २२ आमदारांचा युरोप दौरा

महाराष्ट्राच्या २२ आमदारांचा युरोप दौरा

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे २२ आमदारांचे शिष्टमंडळ युरोपमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आमदारांचे शिष्टमंडळ जर्मनीतील फ्रँकफर्ट, नेदरलँडच्या ॲमस्टरडॅम आणि इंग्लंडच्या लंडन या शहरांना भेट देणार आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करत आहेत. आमदारांच्या शिष्टमंडळात ११ महिला आमदार आहेत. फ्रँकफर्टमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत आमदारांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. ॲमस्टरडॅम येथे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आमदार चर्चा करतील. लंडन येथे संयुक्त महिला आणि समानता विचारमंचाचे प्रतिनिधी तसेच मराठी मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत आमदार चर्चा करणार आहेत. तसेच आमदार भारताच्या अनुक्रमे जर्मनी, नेदरलँड आणि इंग्लंडच्या दुतावासाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. महाराष्ट्राच्या आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालयाला भेट देतील आणि राष्ट्रकुलच्या सरचिटणीसांसोबत चर्चा करतील. या दौऱ्याला सुरुवातीला परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी नव्हती. पण दौऱ्याला अवघे काही तास उरले असताना मंजुरी देण्यात आली. यानंतर आमदारांचे शिष्टमंडळ युरोपच्या दौऱ्यावर रवाना झाले.


सम्बन्धित सामग्री