Sunday, July 07, 2024 11:32:53 PM

there-will-be-light-showers-of-rain
पावसाच्या हलक्या सरी बरसणार

पावसाच्या हलक्या सरी बरसणार

पुणे, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राज्यात पुढील ४८ तासात तासानंतर पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात हलक्या ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण आणि पुण्यात घाट विभागात तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने गुरुवार पासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. राज्यावर येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची तीव्रता वाढणार असल्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यात पुढील सहा ते सात दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तर पुढील सहा दिवस काही ठिकाणी तसेच मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर पुढील सातही दिवस तुरळक ठिकाणी तसेच विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर २६ ते ३० दरम्यान काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.पुण्यात आणि परिसरात सामान्यत: हवामान ढगाळ राहणार आहे. तर पुढील सहा दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. राज्यात बहुतांश भागात पाऊस न झाल्याने या जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. यात मारठवड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. पिकांना पाणी नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

        

सम्बन्धित सामग्री