Thursday, July 04, 2024 09:55:18 AM

finally-the-auction-of-onions-will-start-in-nashik-district
अखेर नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव होणार सुरू

अखेर नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव होणार सुरू

नाशिक, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलाव बंदचा निर्णय मागे घेतला असून अखेर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मध्यस्तीला यश आलेलं आहे. व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय मागे घेतल्याने उद्यापासून कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. मागच्या तीन दिवसांपासून हे लिलाव बंद होते. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भारती पवार यांनी दिलं. त्यानंतर कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

     

सम्बन्धित सामग्री