Friday, July 05, 2024 01:07:23 AM

death-threat-to-mp-navneet-rana
खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोबाईलवर धमकीचे फोन येत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून खासदार नवनीत राणा यांना धमक्या येत आहेत. धमकी देणारी व्यक्ती स्वतःची ओळख विठ्ठल राव अशी करून देत आहे तसेच तिवसा येथून बोलत असल्याचे सांगत आहे. नवनीत राणा यांना 088055 41949 या क्रमांकावरून धमकीचे फोन येत आहेत. 'तू अनेकदा गर्दीच्या ठिकाणी जातेस. अशाच एखाद्या ठिकाणी मी चाकूने वार करेन, तुला लक्षात पण येणार नाही'; अशी धमकी देत नंतर अश्लील शिवीगाळ केली जात आहे. धमकी देणारी व्यक्ती वारंवार आक्षेपार्ह भाषा वापरत आहे.


सम्बन्धित सामग्री