Tuesday, July 02, 2024 08:54:14 AM

chhatrapati-sambhajinagar-gets-water-once-after-eight-days
संभाजीनगरात आठ दिवसाआडही पाणी मिळेना

संभाजीनगरात आठ दिवसाआडही पाणी मिळेना

छत्रपती संभाजीनगर, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीप्रश्नावर अनेकदा खंडपीठात चर्चा झाली. महापालिकेने शपथपत्र सादर करून पाच दिवसांआड पाणी देण्याची हमी दिली. काही महिने अंमलबजावणीही झाली. आता यामध्ये खंड पडला असून, आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. https://youtu.be/tASPXjSuZOE दररोज तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. यामुळे वारंवार पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. आधी एखाद्या वसाहतीत एक दिवस उशिराने पाणी आले तर त्या भागातील राजकीय मंडळी, नगरसेवक आंदोलनाचे शस्त्र उपसत असत. आता तर पाणी आले काय गेले काय? कोणालाच काही देणे घेणे नाही. जुलै, ऑगस्ट मध्ये जायकवाडी, फारोळा येथे वारंवार तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दोन आठवडे उलटल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाचव्या दिवशी ज्या वसाहतींना पाणी मिळायला हवे, ते मिळत नाही. अनेकदा सात - आठ दिवसांनंतर एकदा पाणी मिळते. ही परिस्थिती कधी सुधारणा असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.


सम्बन्धित सामग्री