Wednesday, July 03, 2024 01:47:46 PM

abolish-40-export-duty-on-onion
'कांद्यावरील निर्यात ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करा'

कांद्यावरील निर्यात ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करा

बुलढाणा, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी:  राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करित असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. कांदा वरील निर्यात शुल्क ४० टक्के लावला असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. वाणिज्य मंत्री रविकांत तुपकर काय म्हणाले? शेतकऱ्याला मारण्याच काम केंद्र सरकार करित आहे. एकीकडे सोयाबीन, कापूस शेतकरी मरतोय तर आता केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मरणावर टपले आहे. जर कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द केले नाही. तर दिल्लीतील वाणिज्य मंत्री यांच्या घरात कांदा फेकणार असल्याचा ईशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर् यांनी दिलाय.


सम्बन्धित सामग्री