Sunday, June 30, 2024 09:46:51 AM

today-is-the-first-shravani-somvar-shiva-temples-are-crowded-with-devotees
आज पहिला श्रावणी सोमवार, शिव मंदिरं भाविकांनी गजबजली

आज पहिला श्रावणी सोमवार शिव मंदिरं भाविकांनी गजबजली

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा सण आहे. आजच्या दिवशी शंकराचे दर्शन घेणे आणि नागदेवतेची पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. हल्ली घरोघरी नागपंचमीनिमित्त नाग देवतेची प्रतिकात्मक पूजा केली जाते. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार श्रावण मासातील अर्थात श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. हल्ली अनेक ठिकाणी नागपंचमीनिमित्त नाग देवतेची प्रतिकात्मक पूजा केली जाते. यासाठी पाटावर नागाचे चित्र काढले जाते अथवा नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते. काही ठिकाणी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथे शंकराची आणि नागदेवतेची पूजा केली जाते. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. नागदेवतेला गंध किंवा कुंकू आणि तांदूळ मिश्रीत टिळा लावतात. नागाला हळद, लाह्या, तांदूळ, दूध आणि फुले अर्पण करतात. नंतर उदबत्तीने ओवाळतात आणि आरती करतात. नागदेवतेला नमस्कार करून आशीर्वाद घेतात. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे लवकर दूर होतात असे सांगतात. राहू अथवा केतू ग्रहामुळे कुंडलीत दोष निर्माण झाला असल्यास नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. राज्यातील सर्व शिव मंदिरं फुलांनी सजवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील सर्व शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. येवल्याच्या महामृत्युंजय महादेव मंदिरात भाविकांची गर्दी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेव मंदिरामध्ये सकाळपासूनच शिवभक्तांचे गर्दी बघण्यास मिळाली पहाटेच महादेवाच्या मूर्तीला तसेच शिवलिंगाला दुग्धाभिषेक करत पूजाविधी करण्यात आला. यावेळी मंदिर गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची देखील सजावट करण्यात आली होती. https://youtu.be/z0S6k2sVsOY शंकराची पूजा अथवा शिवपूजा घरात देवघरात शंकराच्या प्रतिमेची अथवा शिवलिंगाची स्थापना करतात आणि त्याची पूजा करतात. घरात शक्य नसल्यास मंदिरात जाऊन शंकराच्या मूर्तीची अथवा शिवलिंगाची पूजा करतात. आंघोळ करून नंतर धूतवस्त्र अथवा सोवळे नेसून शंकराची पूजा करतात. शंकराची पूजा करताना 'ओम नमः शिवाय' हा जप करतात. शिवलिंगाजवळ रुद्राक्षाचे मणी ठेवतात. शंकरासमोर कापूर प्रज्वलित करतात नंतर घंटा वाजवत कापराने शंकराला ओवाळतात. शंकराला अभिषेक करतात. नंतर शंकराची पूजा सुरू होते. आधी पाण्याने नंतर दूध, मध, तूप, दही या पदार्थांनी नंतर पुन्हा पाण्याने शंकराला अभिषेक करतात. शंकराला चंदनाचा टिळा लावतात, काही ठिकाणी शंकराला ताज्या राखेचा लेप लावतात. नंतर शंकराला जान्हवं अर्पण करतात. शंकराला बेलपत्र, धोतऱ्याचे फुल,पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले, फळे, नैवेद्य अर्पण करतात.


सम्बन्धित सामग्री