Saturday, October 05, 2024 04:05:42 PM

चोरट्यांनी बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडले पण....

चोरट्यांनी बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडले पण

पालघर, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  पालघर मधील मासवन येथील बँक ऑफ बडोदा चे एटीएम चोरटयांनी रात्री तोडले असल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोन चोर एटीएम तोडण्यासाठी बँकेत शिरत असल्याची घटना सीसीटीव्ही कैद झालीय. परंतु आतमध्ये रोख रक्कम नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र आपली चोरी दिसू नये यासाठी बँकेत शिरताच त्यांनी सिसीटिव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारण्याची युक्ति लढविली. त्यामुळे संपूर्ण घटना कैद झाली नाही. चोरट्यानं गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम तोडल्याचं समोर आलय. मशीनमध्ये काही दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एटीएममध्ये रोख रक्कम नसल्याने ते काहीही घेऊ शकले नाहीत," असे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान ह्या घटनेचा संपूर्ण तपास मनोर पोलीस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री