Friday, July 05, 2024 03:42:41 AM

first-udyogratna-award-to-ratan-tata
रतन टाटांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार

रतन टाटांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. रतन टाटा यांचे भारताला उद्योगक्षेत्रातील योगदान अनमोल आहे. तसेच त्यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी देण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. दानशूरपणासाठी रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या ओळखल्या जातात. उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न हा पुरस्कार महाराष्ट्र शासन या वर्षीपासून सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.


सम्बन्धित सामग्री