Sunday, October 06, 2024 03:09:26 AM

discussion-of-the-mess-in-the-list-on-the-occasion-of-senate-elections-in-mumbai-university
सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने यादीतील घोळाची चर्चा

सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने यादीतील घोळाची चर्चा

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : 'जय महाराष्ट्र' या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीच्या 'लक्षवेधी' या प्रसिद्ध कार्यक्रमात 'विद्यापीठाच्या कामाचे वाभाडे' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऍड. अमोल मातेले, अभाविपचे प्रदेश मंत्री अमित ढोमसे आणि शिक्षणतज्ज्ञ अरुण सावंत हे सहभागी झाले होते. मतदार यादीत घोळ झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. https://www.youtube.com/watch?v=LTpB0ElLYj0&t अभाविपचे प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी मतदार यादीत घोळ झाल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्याच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली. पण मतदार यादीत घोळ झाला आहे आणि तो दुरुस्त करणे गरजेचे आहे ही बाब पण मान्य केली. भारतात अनेक ठिकाणी विद्यापीठांच्या सिनेट निवडणुका मागील अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. काही ठिकाणी सिनेट निवडणुकांच्या निमित्ताने काय काय घडत असते. या उलट महाराष्ट्रात असे काहीही होत नाही. यामुळे मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणूक होत आहे ही चांगली बाब असल्याचे शिक्षणतज्ज्ञ अरुण सावंत म्हणाले. काही समस्या असल्यास त्या दूर करता येतात. यामुळे सिनेट निवडणुकांच्या मुद्यावर राजकारण करण्यापेक्षा मतदार यादीतील घोळ दुरुस्त करण्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे शिक्षणतज्ज्ञ अरुण सावंत म्हणाले. मतदारयादीत ७५५ पेक्षा जास्त जणांची नावं ३ - ३ वेळा आली आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. पण या मुद्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते नाराज झाले आहेत. सरकार सिनेट निवडणुका पण पराभवाच्या भीतीने टाळत आहे, असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला. तर शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी उद्धव ठाकरे गटाचा आरोप फेटाळला. विद्यापीठ प्रशासनाच्या दैनंदिन कारभारात सरकार हस्तक्षेप करत नाही; असेही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री