Tuesday, July 09, 2024 12:06:25 AM

राजमल लखीचंद ज्वलर्स वर ईडीची धाड

राजमल लखीचंद ज्वलर्स वर ईडीची धाड

साठ जणांच्या ईडीच्या पथकाने जळगाव मधील राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी सुरू केल्यान जळगाव चे सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे. सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून तपासणी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या कर्जाच्या पोटीही ईडी चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या चोवीस तासांपासून ही कारवाई सुरू असून आज पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्याचे आणि आर्थिक व्यवहार कागदपत्रांची तपासणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचवेळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मुंबई, नागपूर , छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन यांचीही चौकशी केल्याचं समोर येत आहे. मात्र माजी खासदार ईश्वर जैन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे. राजमल लखीचंद ग्रुपतर्फे ईडी अधिकाऱ्यांना जी काही माहिती आवश्यक वाटत आहे, त्याबाबत राजमल लखीचंद ग्रुपकडून पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून ईडी पथकाने चौकशी सुरू केल्यापासून राजमल लखीचंद ग्रुपमधील सर्वांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप नेमकी माहिती शकलेली नाही. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेली ही कारवाई आजही दिवसभर चालणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ईडी तपासणीत काय काय हाती काय लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागील काळातही सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले का? याबाबत देखील माहिती समोर आली नाही. त्यानंतर आता या कारवाईमध्ये काय मिळते की केवळ चौकशीचा फार्स ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

           

सम्बन्धित सामग्री