Friday, July 05, 2024 12:55:05 AM

श्वान फिरवण्याच्या वादातून गोळीबार

श्वान फिरवण्याच्या वादातून गोळीबार

इंदूर, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गुरुवारी रात्री उशिरा इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा बाग येथे राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये कुत्रा फिरवण्यावरून वाद झाला. वाद इतका वाढला की एकाने गोळीबार केला. यामध्ये दोन जणांचा मृत्यु झाला. तर एका महिलेसह सहा जण जखमी झाले आहेत. आरोपींनी अगोदर हवेत गोळीबार केला होता.  या प्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला अटक केली आहे. खजराना पोलीस स्टेशन हद्दीतील रामकृष्ण कॉलनीत राहणारा बँक सुरक्षा रक्षक राजपाल सिंग राजावत हा त्याच्या पाळीव कुत्र्याला फिरवत होता. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या विमलने कुत्र्याला दगड मारला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. दरम्यान, राहुल ही तेथे पोहोचला. विमल आणि राहुलला घाबरवण्यासाठी राजपालने घरातून बंदूक काढून हवेत गोळीबार केला. काही वेळाने आरोपींनी विमल आणि राहुलवर गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. राहुल आणि विमलची कुटुंबे मोठ्या संख्येने बाहेर आली. ज्यामध्ये सीमासह ज्योती, ललित, कमल आणि मोहित यांनाही गोळ्या लागल्या. त्यात हे सर्वजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. १२ बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्योती आणि इतरांच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गोळ्या लागल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी राजपाल सिंग याला अटक केली आहे.


सम्बन्धित सामग्री