Sunday, October 06, 2024 03:14:16 AM

mumbai-university-senate-election-postponed-aditya-thackeray-upset
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरे नाराज

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित आदित्य ठाकरे नाराज

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक १० सप्टेंबर २०२३ रोजी होणार होती. पण निवडणूक स्थगित करण्यात आली. स्थगिती लागू होताच नव्या वादाला तोंड फुटले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी सिनेट निवडणूक स्थगित होताच नाराजी जाहीर केली आहे. https://www.youtube.com/watch?v=2f5og6oCyas मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे. निषेध ! या शब्दात वरुण सरदेसाई यांनी सिनेट निवडणूक स्थगित होताच नाराजी जाहीर केली. तर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी जाहीर केली. सिनेट निवडणुकीसाठी आमच्या दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मागील तीन महिन्यांपासून छाननी प्रक्रिया सुरू होती. अचानक निवडणूक रद्द झाली आहे. स्थगितीचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात न्यायालयात जायचे की नाही याचा निर्णय कारण समजल्यानंतरच घेऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेटची निवडणूक ही एक छोटी निवडणूक आहे. ही निवडणूक पण होणार नसेल तर हे लोकशाहीला घातक आहे. शिंदे सरकार आल्यापासून अनेक निवडणुका झालेल्या नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री निवडणुकीला घाबरतात, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

  

सम्बन्धित सामग्री