Thursday, July 04, 2024 10:32:42 AM

paneling-by-the-dada-group-in-beed
बीडमध्ये दादा गटाकडून फलकबाजी

बीडमध्ये दादा गटाकडून फलकबाजी

बीड , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज पहिल्यांदाच बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अशात धनंजय मुंडे समर्थकांकडून शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी अजित पवारांना आशीर्वाद द्या अशी भावनिक साद घालत बीडमध्ये बॅनर झळकवले आहेत. बीडमध्ये शरद पवारांची सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर चर्चेत आहेत. २ जुलै रोजी अजित पवार आणि त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचप्रमाणे या सगळ्यांना नंतर मंत्रिपदंही देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली ही फूट आजही चर्चेत आहे. कारण पहिल्या २ जुलैचा अजित पवारांचा शपथविधी आणि ५ जुलैला झालेली सभा यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे टाळले आहे. https://youtu.be/UIK0cOP2N6A तसेच या दोघांच्या भेटीगाठीही चर्चेत आहे. अशात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत आहेत. साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या. आपला माणूस हक्काचा माणूस. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही बीडकर सदैव्य तुमच्यासह. असा मजकूर या बॅनरवर आहे. हा बॅनर चांगलाच चर्चेत आला आहे. आज शरद पवार बीडमध्ये नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. आमचा पक्ष फुटलेला नाही. काही लोकांनी वेगळा विचार केला आहे असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. तसेच मागच्या आठवड्यात पुण्यात चोरडिया यांच्या घरी जी भेट झाली त्यावर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे सगळ्यांनीच हि कौटुंबिक भेट असल्याचे स्पष्टीकरण दिले. आता धनंजय मुंडे यांनी बॅनरवरुन घातलेली ही भावनिक साद शरद पवार ऐकणार का? अजित पवारांना आशीर्वाद देणार का? याचे उत्तर शरद पवारांकडून आजच्या सभेत अपेक्षित आहे.


सम्बन्धित सामग्री